ॲड. निवेदिता आरगडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या दृष्टिकोनातून आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब,खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती अल्का लांबा यांच्या आदेशाने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासह महिला काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्याचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख पदी ॲड.निवेदिता आरगडे यांना मुंबई येथे नियुक्तीचे पत्र दिले.

निवेदिता आरगडे यांनी पक्षवाढीसाठी मोठे योगदान दिले असून, सातत्याने विविध ठिकाणी पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या मेहनतीला आणि पक्षनिष्ठेला मान्यता देत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. या निवडीबद्दल ॲड. निवेदिता आरगडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या