नवी दिल्लीमहाराष्ट्र

पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसादमहाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचा यशस्वी उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली दि. 20 : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त 17 ते 19 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. इथे आलेल्या प्रकाशकांनी समाधान व्यक्त केले.

प्रदर्शनात मराठी साहित्य, काव्यसंग्रह, चरित्रे, इतिहास, बालसाहित्य आणि विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध होती. मराठी भाषिक आणि दिल्लीतील साहित्यप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली.

या उपक्रमामुळे मराठी वाचक आणि प्रकाशक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. पुस्तक विक्रीस मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता प्रकाशकांनी समाधान व्यक्त केले. तसेच, अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रकाशकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने राजधानी दिल्लीत संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशकांनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button