सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रंगतदार लढत : एकूण १८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांत एकूण ३३४ उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग नोंदवला आहे. यापैकी १५० उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता अंतिम यादीत १८४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. उमेदवारांच्या संख्येत झालेली ही घट जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात उत्सुकता आणि रंगत निर्माण करत आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची स्थिती :

  1. करमाळा (मतदारसंघ क्र. २४४) : अर्ज दाखल – ३१, अर्ज माघारी – १६, अंतिम उमेदवार – १५
  2. माढा (मतदारसंघ क्र. २४५) : अर्ज दाखल – ३०, अर्ज माघारी – १७, अंतिम उमेदवार – १३
  3. बार्शी (मतदारसंघ क्र. २४६) : अर्ज दाखल – ३१, अर्ज माघारी – ११, अंतिम उमेदवार – २०
  4. मोहोळ (अ.जा.) (मतदारसंघ क्र. २४७) : अर्ज दाखल – २७, अर्ज माघारी – १७, अंतिम उमेदवार – १०
  5. सोलापूर शहर उत्तर (मतदारसंघ क्र. २४८) : अर्ज दाखल – २६, अर्ज माघारी – ६, अंतिम उमेदवार – २०
  6. सोलापूर शहर मध्य (मतदारसंघ क्र. २४९) : अर्ज दाखल – ३९, अर्ज माघारी – १९, अंतिम उमेदवार – २०
  7. अक्कलकोट (मतदारसंघ क्र. २५०) : अर्ज दाखल – १५, अर्ज माघारी – ३, अंतिम उमेदवार – १२
  8. सोलापूर दक्षिण (मतदारसंघ क्र. २५१) : अर्ज दाखल – ४०, अर्ज माघारी – १५, अंतिम उमेदवार – २५
  9. पंढरपूर (मतदारसंघ क्र. २५२) : अर्ज दाखल – ३८, अर्ज माघारी – १४, अंतिम उमेदवार – २४
  10. सांगोले (मतदारसंघ क्र. २५३) : अर्ज दाखल – ३२, अर्ज माघारी – १९, अंतिम उमेदवार – १३
  11. माळशिरस (अजा) (मतदारसंघ क्र. २५४) : अर्ज दाखल – २५, अर्ज माघारी – १३, अंतिम उमेदवार – १२

एकूण : जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या ३३४ उमेदवारांपैकी १५० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १८४ उमेदवार निवडणुकीच्या अंतिम यादीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची लढत आता अधिक चुरशीची झाली आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या आणि त्यांचे विविध राजकीय पक्ष व अपक्षांसोबतचे संबंध ही निवडणुकीतील रंगत वाढवणारी बाब ठरली आहे. प्रत्येक मतदारसंघात कोण बाजी मारणार, कोणत्या पक्षाची ताकद वाढणार, याकडे मतदारांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या