लिंगैक्य गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक सप्ताहाची सुरुवात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील औंधकर बृहन्मठाचे लिंगैक्य प.ब्र. श्रीगुरू १०८ गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त बार्शीतील बृहन्मठात दि.३ ते १० नोव्हेंबर दरम्यान विविध शिवाचार्यांच्या उपस्थितीत धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नूतन श्री काशी महास्वामी श्रीश्रीश्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १० रोजी समाधीलिंग प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. रविवारी या सप्ताहाची सुरूपात धार्मिक प्रथेपरंपरेनुसार भक्तीमय वातावरणात करण्यात आली.

या सप्ताहात दररोज रुद्राभिषेक, श्री सिध्दांतशिखामणी धर्मग्रंथाचे पारायण, महाआरती, उपस्थित शिवाचार्यांचे धर्मोपदेश, भजन, शिवपाठ व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम होत असून रविवारी दि. १० रोजी महास्वामीजींच्या हस्ते लिंगप्राणप्रतिष्ठापना व आशीर्वचन व दर्शन सोहळा संपन्न होत आहे.

रविवारी श्रीगुरू विरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज, राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज, प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज यांच्या उपस्थितीत या धार्मिक उत्सताची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शार्दूल महेंद्र निंबर्गीकर स्वामी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या