खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात बार्शीत जोडेमारो आंदोलन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने बार्शी येथील पोस्ट चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि गद्दार खासदार यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला. तसेच घोषणाबाजी करत त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. शिवसेना पक्षाशी व उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप यावेळी उपजिल्हाप्रमुख देवा दिंडोरे यांनी केला.
या आंदोलनात शिक्षक सेनेचे बाळासाहेब मुडे सर, आयुबभाई मुजावर,आबा गपाट, माजी नगरसेवक बापू जाधव, जिल्हासचिव दिपक तिवाडी,युवासेनेचे उपतालुकाप्रमुख स्वराज क्षीरसागर,तालुका समन्वयक ॲड. पांडुरंग घोलप, अर्जुन सोनवणे, महेेंद्र गरड,गणेश खडके,मिठू बोराडे,अमोल मोरे, प्रकाश पोफळे,माजी सरपंच अशोक घायतिडक व ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून यावेळी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.




