माळेवाडी येथील घटनेचा आंबेडकरी पक्ष, संघटना, कार्येकर्ते यांच्यावतीने जाहीर निषेध

0

B1न्युज नेटवर्क

बार्शी : मानवतेला काळिमा फासणाऱ्या मौजे माळेवाडी येथील मातंग समाजाच्या मयत धनंजय साठे यांच्या अंत्यविधीवेळी गावातील गावगुंड व कुठलीही कार्यवाही न करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना पोलीस निरीक्षक बार्शी यांचेमार्फत निवेदन देण्यात आले सदरची घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नसून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


यावेळी रिपाइं (आ)चे शहराध्यक्ष अँड. अविनाश गायकवाड, बसपाचे शहाराध्यक्ष अँड. प्रसन्नजित नाईकनवरे, रासपचे शहाराध्यक्ष मक्रोज बोकेफोडे, नगरपालिका कामगार संघटनेचे नितीन शेंडगे, आनंद कांबळे, रिपाइं उद्योग आघाडी अध्यक्ष विजय विध्यागज, सनी गायकवाड, अजित कांबळे, कुमार कांबळे, दिलीप सरवदे,कंत्राटी कामगार नेते अतुल पेटाडे, रिपाइं युवक अध्यक्ष अँड. धीरज कांबळे, व जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पवार उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या