महाराष्ट्रसोलापूर

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी जनजागृतीपर कार्यक्रम राबवावेत : पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात यावेत. तसेच प्रत्येक सदस्यांकडे दत्तक देण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये शाळा/महाविद्यालये सुरू झाल्यानंतर प्रस्तावित कार्यक्रमांचा आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांनी दिल्या.


जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, सिव्हील हॉस्पिटलचे प्रतिनिधी डॉ. रोहन वायचळ, टपाल विभागाचे एम. आर. पल्लेवाड, प्रभारी अधिकारी लोहमार्ग पोलीस ठाणे प्रतिनिधी एस. भाजीभाकरे, प्रदीप पवार आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.


जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे म्हणाले, अंमली पदार्थ सेवन व त्याचे दुष्परिणाम, त्याबाबतचे कायदे यासंदर्भात जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये भेट देऊन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम हाती घ्यावी. यातून भावी पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यापासून सुरक्षित राहील, समिती सदस्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ उत्पादन होत नसल्याबद्दल दक्ष राहावे. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button