प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९ शाळांना ११ ई लर्निंग इंटरॅक्टीव्ह पॅनलचे वाटप

0

संबंधित शाळांमधील शिक्षकांना ई- लर्निगचे प्रशिक्षण संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील ९ शाळांना ११ वर्गखोल्यांमध्ये सीएसआर च्या मध्यमातून ई लर्निंग इंटरॅक्टीव्ह पॅनल चे वाटप करण्यात आले. याच ९ शाळांमधील एकूण ५५ शिक्षकांचे प्रशिक्षण सोलापूर येथील सेवासदन शाळामध्ये संपन्न झाले. सेवासदन संस्थेच्या सचिव विना पत्की, मुख्याध्यापिका रणपिसे मॅडम सर फाऊंडेशनचे बाळासाहेब वाघ, सिद्धाराम मासाळे, अनघा जहागिरदार, राजकिरण चव्हाण व अन्य शिक्षक यांच्या उपस्थिती मध्ये ह्या प्रशिक्षणाचे उदघाटन झाले.
उदघाटन प्रसंगी विना पत्की यांनी प्रिसिजनचा ई लर्निंग प्रकल्पाचे कौतुक करून ह्या प्रकल्पमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते मध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल तसेच शिक्षकांना शिकवताना इंटरअ‍ॅक्टिव्ह टूलमुळे अधिक सोप्या पद्धतीने शिकविता येईल, प्रिसिजनचा ई लर्निंग प्रकल्पा म्हणजे विद्यार्थी व शिक्षकांना ‘पॅसिव्ह’ न होऊ देता अधिकाधिक ‘अ‍ॅक्टिव्ह’ करणारी, विचार करायला भाग पाडणारी ही अत्याधुनिक शिक्षणपद्धती आहे.असे त्या आपल्या उदघाटनपर भाषणात म्हणाल्या. त्यानंतर सर फाऊंडेशनचे बाळासाहेब वाघ यांनी मनोगत व्यक्त केले सर फाऊंडेशन आणि प्रिसिजन मिळून हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यात कशा पद्धतीने राबवित आहे याची माहिती त्यांनी दिली.

ई लर्निंग’ म्हणजे काय ?
दृक्-श्राव्य(ऑडिओ-व्हिजुअल) माध्यमाचा माणसाच्या मनावर मोठा परिणाम होत असतो. केवळ अक्षरं वाचण्यापेक्षा या माध्यमातून मांडलेली गोष्ट जास्त परिणामकारक असते. या पद्धतीमुळे मनाला आणि मेंदूला येणारे अनुभवही वेगळे असतात आणि त्यामुळे ते दीर्घकाळ लक्षात राहतात. छापील स्थिर चिन्हांपेक्षा ही हलणारी चित्रं मेंदूला निश्चितच आवडतील आणि समजतील. त्यामुळे अर्थातच संकल्पना मूळातून समजेल आणि दीर्घकाळ स्मरणात राहील. पण ‘ई लर्निंग’ म्हणजे पडद्यावर काहीतरी अ‍ॅनिमेटेड हालचाल पाहणं एवढंच आहे का? तर नाही. पाहिल्यामुळे मेंदूची उत्कंठा वाढेल पण तो एंगेज होणार नाही. त्यासाठी काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी करावी लागेल. यासाठीच प्रिसिजनच्या ई लर्निंग प्रोजेक्टमध्ये केवळ काहीतरी ऑडिओ-व्हिजुअल दाखवलं जात नाही तर इंटरअ‍ॅक्टिव्ह टूलच्या माध्यमातून मुलं ई लर्निंग किट प्रत्यक्ष हाताळून पाहतात. २०१५ पासून हा प्रकल्प चालू आहे
प्रिसिजन ई लर्निंग प्रकल्प एका दृष्टीक्षेपात
एकूण तालुके : १०
एकूण गावे : १२०
एकूण शाळा : १४४
एकूण डिजिटल क्लासरूम्स : १६१
एकूण लाभार्थी शिक्षकसंख्या : ११५०
एकूण लाभार्थी विद्यार्थीसंख्या : २८,७०९

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या