जयंतीबार्शी

क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ भिमनगर, बार्शी यांच्या वतीने क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर चौक येथे बार्शी नगर परिषदेचे मा.मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद, रिपाई नेते चंद्रकांत बोकेफोडे, वीरेंद्र कांबळे, सूर्यकांत लोंढे, माजी नगरसेवक महेदिमिया लांडगे, दिपक काकडे, अविनाश गायकवाड, पंडित प्रतापे, गौतम सोनवणे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते‌.
मंडळाचे अध्यक्ष सनि गायकवाड, खजिनदार शंकर वाघमारे यांनी सर्वांचे स्वागत केले. जयंतीचे औचित्य साधून सर्व मान्यवरांनी परिसराची स्वच्छता करून महामानवांना अभिवादन केले. यावेळी रुपेश बंगाळे, धीरज भोसले, दयावान कदम, नितीन मस्के, अजित कांबळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button