ग्रामपंचायतनिवडबार्शी

गुळपोळीच्या सरपंचपदी सविता चिकणे बिनविरोध

बार्शी : सरपंचपदी निवड झाल्यानंतर सविता चिकणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता अण्णासाहेब चिकणे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या सरपंचपदासाठीच्या निवडणुकीसाठी चिकणे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शरद शिंदे, तलाठी रावसाहेब शेळके, ग्रामसेवक यशवंत तळेकर यांनी बिनविरोधची घोषणा केली.

यावेळी उपसरपंच कैलास काळे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे, कृष्णा चौधरी, निरंजन चिकणे, अर्चना चिकणे, सुनीता काळे, माजी सरपंच शुभांगी नरखडे, शांताबाई चिकणे उपस्थित होते. श्रीकांत मचाले, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल चिकणे, उपाध्यक्ष हणुमंत पाटील, दीपक चिकणे, शिवाजी बारवकर, अण्णासाहेब चिकणे आदींनी नूतन सरपंचांचा सत्कार केला. निवडीनंतर गुलाल उधळून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button