आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते सौंदरे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन…

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील सौंदरे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते ७ कोटी ६६ लाख रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच सौंदरे गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.

सौंदरे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते येमाई देवी तलावचे साठवण तलावात रुपांतर करणे यासाठी ५ कोटी, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी,गावअंतर्गत पाईपलाईन करणे यासाठी १ कोटी ६१ लाख,आमदार निधी व २५/१५ योजनेतून तलाठी ऑफिस ते बार्शी – सोलापूर रोड काँक्रीट रस्ता व गटार करणे यासाठी २३ लाख,लिंगाडे डी.पी.ते वेस पर्यंत कॉंक्रीट रोड व पेव्हींग ब्लॉक बसविणे यासाठी ३० लाख,मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत संभाजी जाधव शेत ते राजेंद्र सुरवसे शेतापर्यंत करणे यासाठी २४ लाख,१५ वा वित्त आयोग व गौण खनिज योजनेअंतर्गत कॉंक्रीट रोड व गटार करणे यासाठी १४ लाख,दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत कॉंक्रीट रोड करणे यासाठी ८ लाख, विठ्ठल-रखुमाई सभा मंडपासाठी ५ लाख,१५ वा वित्त आयोगातून ग्रामपंचायत कार्यालय सुशोभि करणे यासाठी २ लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असुन गावा-गावातील भांडण तंटे विसरून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या समस्या सोडवुया असा सल्ला देत सौंदरे गावातील ज्या ज्या समस्या असतील त्या मला सांगा तसेच बार्शी तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून जी विकास कामांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती सोडवण्यासाठी मी पुर्णपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.

यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,रमेश(आण्णा)पाटील, माजी नगरसेवक विलास रेणके, माजी नगरसेवक प्रशांत कथले,बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे,बाजार समितीचे उपसभापती झुंबर दादा जाधव,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले,माजी उपसभापती प्रमोदजी वाघमोडे,उद्योजक तथा उपसरपंच राजाभाऊ सुरवसे,माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान डोईफोडे,उद्योजक रवींद्र राऊत, विठ्ठल भोसले, पिंटू लोंढे, दत्तात्रय मोरे, वैभव शिंदे तसेच इतर प्रमुख मान्यवर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या