बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे रुग्णांना क्षयरोग विषयी माहिती देण्यात आली. यावेळेस क्षयरोगाची लक्षणे, निदान पद्धती, औषधोपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत रूग्णांना माहिती देण्यात आली. यावेळेस क्षयरोग रुग्णाना प्रोटीन पावडर चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल बोपलकर यांनी रूग्णांना आहार, औषधोपचार याविषयी माहीती सांगितली. तसेच क्षयरोग हा आजार कायमचा नष्ट करण्यासाठी जनजागृती, घ्यावयाची काळजी, उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल बोपलकर, डॉ. रवींद्र माळी, डॉ. चारुदत्त शितोळे तसेच क्षयरोग पथक बार्शी मेघनाथ गायकवाड (STS), अल्ताफ पठाण (TBHV), शैलेन्द्र गायकवाड (STLS) तसेच ग्रामीण रुग्णालय बार्शीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.