रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेप

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला राजकीय यश लाभत आहे. नुकत्यात झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडुन आले. देशभरात रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे येणा-या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष किती जागांवर विजय मिळवतो . आगामी काळेात महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष काय राजकिय कामगिरी करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांत आपले उमेदवार निवडुन आणण्याची कामगिरी करून दाखवावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
गोराई येथील हॉटेल बेव्हयु सभागृहात आमचे रामदास आठवले या गीताच्या ध्वनीचित्रफितीचे
ना.रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी झालेल्या रिपाइं च्या कार्यकर्ता मेळाव्यात ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंच्या आगरी कोळी आघाडीचे अध्यक्ष ऋषी माळी आणि सौ. निलीमा माळी यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या आपले रामदास आठवले या व्हिडीयो गीताचे प्रकाशन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी ’आमचे रामदास आठवले’ या गीताचे गायक जयवंत भंडारी, निलीमा माळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, ज्येष्ठ नेते कमलेश यादव, भाजप च्या स्थानिक नगरसेविका अंजली खेडेकर; रिपाइं युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते; भाग्यराज परिहार; अमित तांबे; हरीहर यादव, परशुराम माळी; सहदेव कटके, प्रकाश जाधव, रमेश गौड; अभया सोनावणे, उषा रामाळु, सोना कांबळे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.