बार्शीत कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२० वी जयंती अर्थात समाजदिन उत्साहात साजरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

जनजागरण फेरीतून सामाजिक संदेश, आकर्षक पेहरावातील विदयार्थ्यांचे जल्लोषात सादरीकरण

बार्शी : आकर्षक पेहराव केलेले एकाच वेशभूषेतील विदयार्थी…ढोल ताशाचा गजर.. लाठी काठी, तलवारबाजी असे मर्दानी खेळाचे सादरीकरण..विविध प्रशालेच्या विदयाथिर्नींचे लेझीम, टिपरी नृत्य..रूक्माई गीत.. देशभक्तीपर गीते..अमर रहे अमर रहे..जगदाळे मामा अमर रहे..अशा उत्साही वातावरणात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२० व्या जयंतीनिमीत्त काढण्यात आलेल्या, जनजागरण फेरीतून विविध प्रशालेंच्या पथनाटय व चित्ररथांनी सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता, संविधान सन्मान, ग्रामस्वच्छता. रस्ता सुरक्षा जाणीव जागृती, पर्यावरण रक्षण, पाण्याची बचत, आरोग्य जनजागृती, अवयवदान, व्यसनमुक्ती असे सामाजिक संदेश दिले. शहरातील प्रमुख मार्गावरून ही जनजागरण फेरी जात असताना शहरवासियांनी कमानी उभारून उत्फूर्त स्वागत केले. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.प्रारंभी सकाळी तुळजापूरहून आलेल्या कर्मवीर ज्योतीचे संस्था पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, लक्ष्मीबाई जगदाळे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जनजागरण फेरीचे उदघाटन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव अरूण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, व्ही.एस.पाटील, डॉ.गुलाबराव पाटील, प्रा.दिलीप रेवडकर, डॉ.प्रकाश बुरगुटे,  प्रताप जगदाळे, प्रा.डॉ.सुरेश लांडगे, प्राचार्य एस के पाटील, प्राचार्य डॉ.दिपक गुंड यांच्यासह विविध प्रशालेंचे प्राचार्य, प्राध्यापक, संस्था विश्वस्त व कर्मवीर प्रेमी उपस्थित होते.जनजागरण फेरीच्या अग्रभागी ट्रॉलीमध्ये कर्मवीर जगदाळे मामांचा पूर्णाकृती पुतळा व त्यानंतर विविध शाळा महाविदयालयांची पथके सहभागी झाली होती. जिजामाता विद्यामंदिर, शिशु संस्कार केंद्र, महात्मा फुले विदयामंदीर, शिशु संस्कार प्राथमिक विदयामंदीर, जिजामाता कन्या प्रशाला, महाराष्ट्र विदयालय, शंकरराव निंबाळकर अध्यापक विदयालय, कर्मवीर कृषी तंत्र विदयालय, शिक्षणशास्त्र महाविदयालय, शिवाजी महाविदयालय, बी.पी.सुलाखे काॅमर्स कॉलेज, राजर्षी शाहू विधी महाविदयालय, कॉलेज ऑफ नर्सिंग, जगदाळे मामा हॉस्पीटल व त्यानंतर जामगांव येथील आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राचा व्यसनमुक्तीबाबत संदेश देणारा रथ यांचा या जनजागरण मिरवणूकीत सहभाग होता.जनजागरण फेरीच्या निमीत्ताने विदयार्थी, विदयार्थिनींनी फेटे, तसेच पारंपारिक पोशाख अशा पेहरावात लेझीमसह विविध नृत्याचे सादरीकरण केले. सवादय निघालेली ही आकर्षक जनजागरण फेरी पाहण्यासाठी शहरवासियांनी गर्दी केली होती. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने जनजागरण फेरीचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. त्यांच्याकडून विदयार्थ्यांना मिठाई, खाऊ, पाणी, सुगंधी दूध, एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले. दुपारी संस्थेच्या प्रांगणात या जनजागरण फेरीची सांगता झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या