मधुबन ट्रॅक्टर्स च्या नूतन शाखेचा वैराग येथे शुभारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जगप्रसिद्ध जॉन डियर ट्रॅक्टर चे अधिकृत वितरक मधुबन ट्रॅक्टर्स यांच्या नूतन शाखेचा वैराग ता. बार्शी येथे भव्य शुभारंभ जॉन डियर इं.प्रा. लि. चे महाराष्ट्र एरिया मॅनेजर श्री अंकित सक्सेना यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जॉन डीअर फायनान्स डीव्हिजनल बिझनेस मॅनेजर डी.सुरेंद्र,असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर, टी.सी.एस. मॅनेजर राजेश पाटील, संतोष (दादा) निंबाळकर, शिवाजी सुळे, प्रभाकर पाटील, NMK-1 गोल्डन सीताफळाचे निर्माते डॉ.नवनाथ कसपटे,मधुबन ट्रॅक्टर्स चे चेअरमन प्रवीण कसपटे, प्रमुख व्यवस्थापक माणिक हजारे इ. उपस्थित होते.डी.सुरेंद्र यांनी जॉन डियर फायनान्सच्या विविध योजनांची ग्राहकांना माहिती दिली. अंकित सक्सेना यांनी जॉन डियर कंपनीच्या प्रगत तंत्रज्ञान बद्दल माहिती दिली. संतोष दादा निंबाळकर यांनी वैराग येथील शाखेमुळे 50 पेक्षा जास्त गावातील ग्राहकांची गैरसोय दूर होणार असल्याचे मत व्यक्त केले. कैलास तासकर यांनी शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरण संदर्भात सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रवीण कसपटे यांनी भविष्यात देखील ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी मधुबन ट्रॅक्टर्स कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ. नवनाथ कसपटे यांनी एन.एम.के वन सीताफळासारखाच जॉन डीअर हा सर्वोत्तम ब्रँड असल्याने आम्ही त्याच कंपनीची निवड केली असे मत व्यक्त केले. माणिक हजारे यांनी वैराग भागात जॉन डीअर ची शाखा उघडण्या मागचे प्रयोजन सांगितले. यावेळी जॉन डीअर चे समाधानी ग्राहक प्रभाकर पाटील व तानाजी विधाते यांनी मधुबन ट्रॅक्टर्स कडून उत्तम सर्विस मिळत असल्याबद्दल आभार मानले. या उद्घाटनाच्या निमित्ताने नवीन सहा ग्राहकांना जॉन डियर ट्रॅक्टर सुपूर्द करण्यात आले. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील TREM-IV टेक्नॉलॉजी चा पहिला ट्रॅक्टर 5405 तुषार साळुंखे यांनी खरेदी केला. तसेच जॉन डीअर चा W-70 हार्वेस्टर सिद्धेश्वर अशोक लिमकर यांनी खरेदी केला. कार्यक्रमास वैराग पंचक्रोशीतील ग्राहक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक हजारे यांनी केले. सूत्रसंचालन नरेश ठाकूर यांनी केले तर आभार समाधान घोलप यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या