मालवंडी ग्रामपंचायत सरपंच पदी नवनाथ गवळी यांची बिनविरोध निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी नवनाथ गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अकरा सदस्य संख्या आसलेली ग्रामपंचयत ही बिनविरोध झालेली होती. त्यामुळे या आदीचे सरपंच हनुमंत होनमाने यांनी ठरल्याप्रमाने राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. ठरल्याप्रमाने नवनाथ गवळी यांना बिनविरोध सरपंच केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही आय मेकाले, ग्रामविकास अधिकारी  के.आय. सय्यद, तलाठी एस टी ठोंबरे यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी सरपंच पदासाठी नवनाथ गवळी यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीसाठी ग्रामपंचायत सदस्य विष्णु चव्हाण  रामलिंग घेवारे, हनुमंत होनमाने लहू काटे,  पूजा नरुटे, सैनाबी मुजावर, अनिता खंडागळे, अरूणा कुलकर्णी , मंदाकिनी कावरे, संध्या होनराव हे उपस्थित होते निवडीनंतर गावकऱ्यांच्या वतीने सरपंच  यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी  माजी डी वाय एस पी रामभाऊ थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब काटे धन्यकुमार साखरे संतनाथ खंडागळे पोलिस पाटील पांडुरंग सलगर सोमनाथ थोरात महेश साखरे  महादेव सलगर  अमोल  दहिवडकर  अनिल पाटील पांडुरंग परीट शिवाजी नरुटे विजयकुमार कुलकर्णी  आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या