अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना लाभ घेण्यासाठी १५ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड-अलिबाग : सन-२०२६-२७ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सुक्ष्म सिंचन) अंतर्गत अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार, ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा लाभ मिळवून देण्यासाठी दि.१५ सप्टेंबर ते दि.१५ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.

इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर पुढील संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी व अर्ज सादर करावेत, त्यासाठी https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/AgriLogin, संकेतस्थळावर भेट द्यावी.500शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना माहिती अत्यंत अचूक भरावी, अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. या पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य वा तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज करताना शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टैंक फार्मर आयडी, ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे अनिवार्य आहे. योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला कमाल ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहील.

अधिक माहितीसाठी तसेच ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत मदतीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सामूहिक सेवा केंद्र (सीएससी), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या