बार्शी येथे ‘मिरगणे इलेक्ट्रिकल्स & ट्रेडर्स’ चा भव्य शुभारंभ; आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मांडेगाव येथील सुप्रसिद्ध पंडीत मिरगणे व परिवाराच्या मालकीच्या मिरगणे इलेक्ट्रिकल्स & ट्रेडर्स या नवीन व्यवसायाचे उद्घाटन आज बार्शी शहरातील उपळाई रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते फीत कापून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार राजेंद्र राऊत यांनी मिरगणे परिवाराला नवीन व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या व पंडीत मिरगणे व परीवाराने प्रामाणिक कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय नक्कीच भरभराटीला येईल.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य,बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड,खडकलगावचे माजी सरपंच दिपक रोंगे,नगरसेवक विजय चव्हाण,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, मदन गव्हाणे,महेश देशमुख,ईश्वर जाधवर तसेच मिरगणे परिवारातील सदस्य, मित्रपरिवार आणि बार्शीतील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




