महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क स्पर्धापरीक्षा रविवारी (दि.६), १४ केंद्रांवर ४ हजार ७५२ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत आयोजित मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा-२०२६ रविवार, दि. ६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ शाळा व महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर एकूण ४ हजार ७५२ उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ४८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांनी दिली आहे.

ही परीक्षा दोन सत्रांत होणार असून सकाळचे सत्र सकाळी ११ ते दुपारी १२ आणि दुपारचे सत्र दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल.

परीक्षा केंद्र व परीक्षार्थी संख्या याप्रमाणे-

१) मौलाना आझाद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, रोझाबाग, हर्सूल रोड (विज्ञान इमारत), भाग-अ – ३१२.
२) मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, रोझाबाग, हरसूल रोड (टॉम पॅट्रिक बिल्डिंग), भाग-ब – ४८०.
३) श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, एन-८, सिडको – ३१२.
४) गोदावरी पब्लिक स्कूल (माध्यमिक), विवेकानंद नगर, एन-१२, हडको – २८८.
५) बळीराम पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सिडको, एन-९, एम-२ – ३१२.
६) एम.जी.एम. जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेज, एन-६, सिडको – ४८०.
७) एम.जी.एम. संस्कार विद्यालय, एन-६, सिडको, मध्य नाका – २४०.
८) डॉ. रफीक झकारिया कॉलेज फॉर वुमेन, नवखंडा, जुबली पार्क – ४३२.
९) मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, नागसेन वन – ३१२.
१०) सरस्वती भुवन बॉईज स्कूल, औरंगपुरा – ४३२.
११) ए.के. वाघमारे प्रशाला, सरस्वती नगर, औरंगपुरा – २८८.
१२) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा – २८८.
१३) शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक), उस्मानपुरा – ३१२.
१४) शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदारी गेस्ट हाऊसजवळ, विश्वास नगर – २६४.
500

परीक्षार्थींसाठी सुचनाः

सुधारित कार्यपद्धतीनुसार प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. निर्धारित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
परीक्षेला येताना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारातील वाहनचालक परवाना यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षात प्रवेशपत्र, काळ्या किंवा निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत याव्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य नेण्यास परवानगी असणार नाही.

डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल फोन, ब्लूटूथ, कॅमेरा फोन किंवा तत्सम संदेशवहन उपकरण तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणल्यास ते परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे लागेल. या साहित्याची जबाबदारी आयोग अथवा परीक्षा केंद्राची राहणार नाही. प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्राच्या आवारात आणल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारावर नियमानुसार फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह आयोगाच्या आगामी परीक्षांना बंदी घालण्याची कारवाई होऊ शकते.

परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी स्वतः परीक्षा व्यवस्थेच्या पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत. सर्व उमेदवारांनी आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांनी कळविले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या