
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष व दैनिक एकमत या वृत्तपत्राचे तालुकाप्रतिनिधी विवेक गजशिव हे बी.ए. एल.एल.बी च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा 81 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
यापूर्वी विवेक गजशिव यांनी १२ वी सायन्स मधून,पत्रकारिता करण्यासाठी जर्नालिझम, आय.टी.आय डिझेल मॅकेनिक, बी.ए. इतिहास या विषयातून तर एम.ए. मराठी या विषयातून केले आहे. शिक्षणासोबत सामाजिक क्षेत्रातही कार्य करत आंबेडकरी विचारधारेचा वैचारिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी शहराबरोबर तालुक्यातओळख निर्माण केली आहे.
राजकीय क्षेत्रातही एक वेगळ्याच प्रकारचा ठसा उमटवत शहराबरोबर ग्रामीण भागातील वंचित,शोषित,पीडित कार्यकर्त्याचा आवाज बुलंद करण्याचे काम विवेक गजशिव यांनी वारंवार केले आहे.यावेळी गजशिव हे एल.एल.बी वकिली पास झाल्यामुळे सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या आहेत.



