आमदार राजेंद्र राऊत यांच्या नागरी सत्काराचा भव्य शाही सोहळा; ९ ऑगस्टला निगडी, पुणे येथे सोलापूरकरांचा स्नेहमेळावा

0

मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील सोलापूरकरांना उपस्थितीचे आवाहन!

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुणे : सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा भव्य स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता निगडी येथील सीझन्स बँक्वेट अँड लॉन्स येथे संपन्न होणार आहे.

या भव्य नागरी सत्कार सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री माधुरी मिसाळ तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, महेश लांडगे, शंकर जगताप, हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, राणाजगजितसिंह पाटील, विधानपरिषद सदस्या उमा खापरे, विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर, अमित गोरखे, आमदार राहुल कुल तसेच ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.500सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना एकत्र आणून परस्पर संवाद, स्नेहभाव आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सोलापूरकरांना एकाच व्यासपीठावर आणत सामाजिक बांधिलकी मजबूत करण्याबरोबरच नव्याने निवडून आलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक जीवनातील विविध क्षेत्रांतील सोलापूरकरांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध होणार असून, परस्पर सहकार्य, संवाद आणि सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी अधिक माहितीसाठी ९७३०१४८८१६, ९८५०९४९०००, ९८५०२९३९८९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.600

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या