महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय सोलापूर चा राज्यात दुसरा क्रमांक

0

सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, (CMRC) शेटफळ, ता. मोहोळ चा पुणे विभागात उत्कृष्ट साधन केंद्र म्हणून गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ची सन 2025-26 या वर्षाची राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठक दि 30 व 31 जुलै 2026 रोजी मुंबई येथे पार पडली, माविम च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती राजलक्ष्मी शहा मॅडम (भा.प.से.) याच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माविम चे महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे, महाव्यस्थापक (वित्त व प्रशासन) अशोक फळणीतकर, व्यवस्थापक श्रीमती रूपा मिस्त्री, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राखी मिराशी, व्यवस्थापक गौरी दोंदे व मुख्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी याच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

सदर राज्यस्तरीय बैठकीत सन 2025-26 या वर्षात केलेल्या कामगिरीचा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कार्यालयाचा आढावा घेण्यात आला व जिल्ह्याच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले या मध्ये राज्यातील अधिक व्याप्ती/कार्यभार (Heavy Loaded) प्रवर्गामध्ये माविम सोलापूर जिल्हा कार्यालयास उत्कृष्ट कामगिरी साठी राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. तर अमरावती जिल्ह्यास पहिला तर तिसरा क्रमांक वाशीम व यवतमाळ या दोन जिल्ह्यास प्राप्त झाला. तसेच माविम सोलापूर अंतर्गत कार्यरत सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र शेटफळ, ता मोहोळ या साधन केंद्राला उत्कृष्ट कामगिरी बाबत पुणे विभागातून निवड करण्यात आली.

माविम च्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा मॅडम यांच्या हस्ते माविम जिल्हा कार्यालयास सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व टीम चे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी मन्सुर पटेल यांनी पुणे विभागाचे विभागीय सल्लागार विलास बच्चे व विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे , माविम जिल्हा कार्यालयातील सहकारी दीपक टेकाळे, परमेश्वर इंगळे, राजकुमार पवार यांच्या सह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले.

त्यासोबतच माविम सोलापूर अंतर्गत कार्यरत सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, शेटफळ, ता. मोहोळ या केंद्रास पुणे विभागातून उत्कृष्ट साधन केंद्र म्हणून निवड करून साधन केंद्रास सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदरील सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र साधन केंद्राच्या उपाध्यक्षा संगीता सावंत , व्यवस्थापक नितिन साठे व माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी मन्सुर पटेल यांनी स्वीकारले.5000माविम सोलापूर जिल्हा कार्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत जिल्ह्यात 8850 महिला बचक्त गटांची स्थापना करण्यात आलेली असून त्यातून जवळपास 90,000 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे, तसेच 22 लोकसंचलित साधन केंद्राची (CMRC) स्थापना करण्यात आलेले आहेत, या लोकसंचलित साधन केंद्रामार्फत महिलांच्या सक्षमीकरसाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते, महिलांना व बचत गटांना त्यांच्या गरजेप्रमाणे विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात, मागील वर्षतात या लोकसंचलित साधन केंद्रामार्फत जवळपास 3177 बचत गटांना 172 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेमार्फत मिळवून देण्यात आलेले आहे, तसेच वयक्तिक कर्ज प्रकारामध्ये महिलांनी त्याच्या व्यवसायात अधिक वाढ करण्यासाठी 650 महिलांना विविध बँकेमार्फत रु 4.5 कोटी वयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत 34 उपप्रकल्प मंजूर असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे तसेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) अंतर्गत महिलांच्या 15 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आलेले असून त्या अंतर्गत 15 प्रकल्प मंजूर आहेत व मॅग्नेट प्रकल्पांतर्गत 1 उपप्रकल्प मंजूर आहे , त्यासोबतच वॉटर प्रकल्प व GTM प्रकल्प जिल्ह्यात सुरू आहेत या सर्व प्रकल्पाची अंमलबजावणी माविम जिल्हा कार्यालय व लोकसंचलित साधन केंद्रामार्फत सुरू आहे, सर्व योजनांच्या/प्रकल्पाच्या अमलबजावणी चे सन 2025-26 या वर्षाचे माविम मुख्यालय, मुंबई मार्फत मूल्यांकन करून माविम सोलापूर जिल्हा कार्यालयास अधिक व्याप्ती/ कार्यभार प्रवर्गातील जिल्ह्यातून दुसरा क्रमांक म्हणून निवड करण्यात आली आहे, या निवडीबाबत माविम जिल्हा कार्यालय चे सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षात होत आहे.

या कामगिरी साठी माविम जिल्हा कार्यालयातील सर्व अधीकारी , कर्मचारी, तालुका अभियान कक्ष टीम, जिल्ह्यातील सर्व साधन केंद्राचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, सर्व कर्मचारी व CRP या सोबतच माविम जिल्हा कार्यालयास मार्गदर्शन करणारे पुणे विभागाचे विभागीय अधिकारी व मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा खुप मोलाचा वाटा आहे.
मन्सुर पटेल
जिल्हा समन्वय अधिकारी,
माविम, सोलापूर.
500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या