बार्शीत अवैध गोमांस साठ्यावर पोलिसांचा छापा; ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. २ ऑगस्ट : बार्शी शहर पोलिसांनी मंगळवार पेठ परिसरात धडक कारवाई करत गोवंश जातीच्या जनावरांची अवैध कत्तल करून गोमांस विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एका संशयितास अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ४६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ५८८/२०२६ नुसार, फिर्यादी पोलीस शिपाई सतीश चंद्रकांत उबडे (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी मुकरम हसन सोदागर (वय ३७, रा. मंगळवार पेठ, बार्शी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ मधील कलम ५(अ), ५(ड) व ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.500पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरात आरोपीने गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत अंदाजे २०० किलो वजनाचे तीन गोवंश जातीच्या जनावरांचे मांस, चार लोखंडी सत्तूर, वजनकाटा, वजन मापे, गोमांस टांगण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी आंगटा व हुक तसेच गोमांस विक्रीतून मिळाल्याचा संशय असलेली ४,२२० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४६,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनेचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मुंडे करीत आहेत.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या