इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत १३ उपकंपन्यांचे जिल्हास्तरीय कामकाज सोलापूर येथे सुरू करण्यात आले आहे. या महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांनी केले आहे.

महामंडळांतर्गत पुढील १३ समाजांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे कार्यरत आहेत— जग्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज), संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (न्हावी समाज), लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज), सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी समाज), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज), संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज), संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज), सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ (गुजर समाज), संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज) आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज).500महामंडळामार्फत सहा योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यामध्ये थेट कर्ज योजना (१ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी), २० टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे.
या योजनांसाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह http://www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर – ४१३००३, दूरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२५९५ येथे संपर्क साधावा.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या