जिल्हा परिषद शाळेतून नीटमध्ये देशात मुलींमध्ये प्रथम; श्रावणी कुदळेची प्रेरणादायी भरारी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

दौंड : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात आलेल्या नीट (NEET) 2026 परीक्षेत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी येथील श्रावणी कृष्णा कुदळे हिने 720 पैकी 710 गुण मिळवत देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्रावणीने देशात पाचवा तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून दौंड तालुक्यासह महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.5000श्रावणीचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण दौंड तालुक्यातील गोपाळवाडी (चोरमले वस्ती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर तिने माळेगाव येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. जिल्हा परिषद शाळेत शिकूनही राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च यश मिळवता येते, हे तिने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले.

या यशामागे तिची अथक मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्तबद्ध जीवनशैली महत्त्वाची ठरली. परीक्षेच्या तयारीदरम्यान तिने तब्बल एक वर्ष मोबाईलचा वापर केला नाही तसेच सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.500श्रावणी ही शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनचे फेलो, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणेचे माजी विद्यार्थी तसेच दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक कृष्णा कुदळे यांची कन्या आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबासह शिक्षक, गावकरी आणि शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. श्रावणी कुदळेची ही यशोगाथा ग्रामीण भागातील आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही शिखर गाठता येते, याचे ती जिवंत उदाहरण ठरली आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या