वातावरण बदलातील आव्हानांना स्वीकारुन कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी शासन कटिबध्द – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

0

शेतकऱ्यांच्या अनुभवांना उच्च तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हॉटेल सेंटर पॉईंट येथे विशेष परिसंवाद संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क500

नागपूर : कृषी क्षेत्रात अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी ते थेट ग्राहक अशी उत्पादन व विक्री श्रृंखला जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभात अधिक वृध्दी दूरापास्त आहे. वातावरणातील अनेक बदलांची आव्हाने स्वीकारत अधिक परिपक्व झालेल्या शेतकरी बांधवांच्या अनुभवांची जोड नवीन उच्च कृषी तंत्रज्ञानाला मिळाल्यास नागपूर जिल्ह्यातील शेतकरी फायदेशीर शेतीचा नवा मार्ग विकसीत करतील असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या अनुभवातील व ज्यांनी विविध प्रगतशील प्रयोग आपल्या शेतीत केले अशा शेतकऱ्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान व्हावे व शासनस्तरावर जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला व्यापक विकास नियोजनाची जोड देता यावी याउद्देशाने येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, उपसंचालक श्रीमती पल्लवी तलमले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातून आमंत्रित करण्यात आलेले जिल्ह्यातील 130 हुन अधिक प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक सहभागी झाले होते.500नागपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा व इतर फळपिके प्रामुख्याने होतात. यात आंतरपिकासह पीक पध्दतीमध्ये बदलाची शक्यता व संधी, वातावरण बदलामुळे किड रोगाचे व्यवस्थापन, विविध अडचणी, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान व नियोजन, शेतकरी उत्पादक कंपन्या, सेंद्रीय शेती, महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध कृषी उत्पादनांचा कृषी व्यवसाय व मनुष्यबळ उपलब्धी याबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाच्या विविध योजना व पात्र लाभार्थ्यांची निवड आणि व्यवस्थापन यांचा सुवर्णमध्ये साध्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. प्रायोगिक तत्वावर व नाविन्यपूर्ण काही कल्पना असल्यास त्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून करण्याबाबत प्रयत्न करु, असे ते म्हणाले.500या परिसंवादात वन क्षेत्राच्या जवळ असलेल्या शेतीतील पिकाच्या संरक्षणासाठी लेझर टेक्नॉलाजी व स्मार्ट तंत्रज्ञान, फळबागेसाठी छाटणी करीता नवीन सुलभ प्रुनिंग मशिन, संत्र्याचे ग्रीडींग व पॅकेजिंग सेंटर, लिफ टेस्टींग लॅब, बुम स्प्रेअर, ठिबक सिंचन प्रणालीसाठी ॲटोमायझेशन याला अधिकाधिक अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबतही या परिसंवादात चर्चा झाली. याचबरोबर बॅटरीवर चालणारे पॉवर टिलर, सोलर ड्रायर, चियासीड व मोहरी यांसारख्या पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे हार्वेस्टर, भात पिकाकरीता डिएसआर यंत्र, भात लावणी यंत्र उपलब्ध करून देणे, सोयाबीन पिकाकरीता बीबीएफ आणि बीज प्रक्रिया यंत्र, कापूस पिकाकरीता कॉटन ग्रेडर आदी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा करण्यात आली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या