आषाढी वारी २०२६: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते धर्मपुरी येथे दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किटचे वाटप

0

आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांसाठी सुविधा सज्ज; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची उपस्थिती

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरोची येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या वतीने आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकरी-भाविकांसाठी पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच एक भाग म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किट व आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले, जेणेकरून प्रवासादरम्यान वारकऱ्यांना तात्काळ आरोग्य सेवा मिळू शकेल.500यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली परतरावर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांनी आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधांची पाहणी करून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.500आषाढी वारी कालावधीत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालखी मार्गावर फिरते वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, तात्पुरते उपचार केंद्र व औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही वारकऱ्याला आरोग्यविषयक अडचण आल्यास तात्काळ सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने नियोजन केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या