बार्शी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत; रणवीर राऊत अध्यक्षपदी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली असून, या संदर्भातील अधिकृत आदेश जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी निर्गमित केले आहेत. पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या शिफारसीनुसार समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी रणवीर राजेंद्र राऊत (रा. राजरत्नचाळ, बार्शी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह विविध प्रवर्गांतील अशासकीय प्रतिनिधी आणि शासकीय सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
समितीतील अशासकीय सदस्य
संतोष बळीराम कांबळे (रा. ताडसौंडणे) – मागासवर्गीय प्रतिनिधी
श्रीमती अर्चना विजय चव्हाण (रा. अलीपूर) – महिला प्रतिनिधी
राहुल नवनाथ जाधवर (रा. चुंब)
नागनाथ मारुती आडसूळ (रा. वायकुळे प्लॉट, बार्शी)
महेश भिमराव गोरे (रा. अलीपूर रोड, बार्शी)
शांतिकुमार शाहू चोबे (रा. जावळे प्लॉट, बार्शी)
संतोष बळवंत पाटील (रा. नारी, बार्शी)
अविनाश प्रमोद वाघमोडे (रा. भातांबरे)
हनुमंत महादेव जाधव (रा. कळंबवाडी, बार्शी)
शासकीय सदस्य
पंचायत समिती, बार्शीचे गट विकास अधिकारी
तहसीलदार, बार्शी (सदस्य सचिव)
समितीमध्ये अध्यक्ष, अशासकीय सदस्य आणि शासकीय प्रतिनिधी अशा एकूण १२ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीमार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांवर विचार करून पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने आदेशात स्पष्ट केले आहे की, योजनेतील अर्जांची छाननी व मंजुरी करताना कोणताही गैरव्यवहार अथवा अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे आढळल्यास समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांच्यावरही शासकीय सदस्यांप्रमाणेच जबाबदारी निश्चित केली जाईल आणि संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. या आदेशाची प्रत सर्व संबंधित सदस्यांना तातडीने बजावून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश बार्शी तहसीलदारांना देण्यात आले आहेत.





