मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना : बार्शी विधानसभा सह-अध्यक्षपदी ॲड. रणवीर राऊत यांची निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दळणवळण अधिक सुलभ व्हावे, शेतमालाची वाहतूक जलद गतीने होऊन उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’ अंतर्गत बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या सह-अध्यक्षपदी तरुण, अभ्यासू व सर्वसामान्यांच्या संपर्कात राहणारे ॲड. रणवीर राजेंद्र राऊत यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.500शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे आणि ग्रामीण विकासाच्या कामांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे ॲड. रणवीर राऊत यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने बार्शी तालुक्यातील शेतकरी, नागरिक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रलंबित पाणंद रस्ते मोकळे करणे, त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण करणे आणि शेतापर्यंत पोहोचणारे रस्ते विकसित करणे यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात जाणे किंवा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविणे सुलभ व्हावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.5000ॲड. रणवीर राऊत यांच्या नियुक्तीमुळे बार्शी विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामांना गती मिळेल, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी नियोजन होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या निवडीनंतर बार्शी शहर व तालुक्यातून ॲड. रणवीर राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध संस्था, शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या