सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसचा रौप्यमहोत्सव उत्साहात; माढा, जेऊर येथे थांब्याची मागणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : सोलापूर-पुणे मार्गावरील प्रवाशांची लोकप्रिय 12158 हुतात्मा सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवासी सेवेची 25 वर्षे पूर्ण केली. यानिमित्त प्रवासी सेवा संघ, सोलापूरच्या वतीने बुधवारी (दि. 15 जुलै) सोलापूर रेल्वे स्थानकावर रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

15 जुलै 2001 रोजी सुरू झालेल्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्यांची यावेळी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेल्वे निरीक्षक निहारकांती, तिकीट निरीक्षक विभागातील साहिल मुलाणी आणि स्वच्छता कर्मचारी निखील गायकवाड यांच्या हस्ते केक कापून रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना केक व लाडूचे वाटप करण्यात आले.500यावेळी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी हुतात्मा एक्स्प्रेसची सुखकर आणि वक्तशीर सेवा देणाऱ्या सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हुतात्मा एक्स्प्रेसला माढा आणि जेऊर रेल्वे स्थानकांवर येता-जाता थांबा मंजूर करावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. धाराशिव, तुळजापूर, वैराग, माढा परिसरातील प्रवाशांसाठी माढा येथे, तर करमाळा, परंडा, जामखेड आणि उजनी धरण परिसरातील प्रवाशांसाठी जेऊर येथे थांबा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी संबंधित खासदारांनी रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.500कार्यक्रमास नंदू दळवी, संजय चौगुले, सिद्राम नुल्ला, निखील दळवी, राजाभाऊ जाधव, गौतम कांबळे, नीता सोनवणे, नागेश पाटोळे, आयुष शिंदे, संकेत चव्हाण, करण शिंदे, अतिश गायकवाड, समीर शेख, रवी कल्लूर, अस्लम शेख, सुनील आडवीतोटे यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या