पंढरपूर शहर पोलिसांची अवैध वाळू वरती कारवाई एक हायवा टिप्पर व व वाळू असा एकूण 16 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर : शहर पोलिसांनी रात्रगस्त दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील इसबावी रोड जुना अकलूज रस्त्यावर एक हायवा टिप्पर त्याचा आरटीओ क्रमांक एम एच 45 ax2374 या या वाहनावर कारवाई करून एकूण तीन ब्रास वाळू व हायवा टिपर असा एकूण 16 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असून सदर वाहनाचा चालक आकाश चव्हाण वय 22 वर्षे राहणार इसवी पंढरपूर याचे विरुद्ध व गाडीचा मालक याचे विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता बी एन एस कायदा कलम 303 305 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप पोलीस हवालदार नवले पोलीस कॉन्स्टेबल ठाकर पोलीस कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.




