प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २७२ सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांचा थेट इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : आषाढी वारी आणि संतांच्या पालखी सोहळ्यादरम्यान जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी पावले उचलली आहेत. दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर्स आणि गुंड प्रवृत्तीच्या अशा एकूण २७२ गुन्हेगारांना सोलापूर पोलीस मुख्यालयात बोलावून पोलीस प्रशासनाकडून थेट आणि कडक शब्दांत तंबी देण्यात आली आहे.

लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलीस तैनात दिनांक १९ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये आषाढी वारी व पालखी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी दिंड्यांसह पंढरपूर नगरीत दाखल होतात. वारकऱ्यांच्या आणि संपूर्ण सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलासह बाहेरील जिल्ह्यातून मागवण्यात आलेला तब्बल १० हजार पोलिसांचा फौजफाटा अहोरात्र बंदोबस्तात व्यस्त राहणार आहे.5000गुन्हेगारांकडून लिहून घेतले ‘चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र’ या मोठ्या जनसमुदायाचा गैरफायदा घेऊन वारीच्या कालावधीत कोणत्याही सराईत गुन्हेगाराने शांतता व सामाजिक सुव्यवस्था बिघडवू नये, यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अतुल कुलकर्णी यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांनी जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी आणि मंगळवेढा या उपविभागांतील तब्बल २७२ गुन्हेगारांना सोलापूर येथील पोलीस मुख्यालयात पाचारण केले होते.

“वारीच्या काळात कोणताही दखलपात्र गुन्हा घडता कामा नये. जर कोणी कायदा हातात घेण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल,” असा सज्जड दम पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांना दिला.
यावेळी उपस्थित सर्व २७२ गुन्हेगारांना शांतता राखण्याचे आवाहन करत, त्यांच्याकडून वारीच्या काळात शांतता राखण्याबाबतचे ‘चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र’ (बॉण्ड) लिहून घेण्यात आले आहे.
50000वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती या विशेष मोहिमेप्रसंगी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांचे इतर सहकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वारीच्या काळात विघ्न आणू पाहणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button