रिपब्लिकन पक्ष येत्या 14 ऑक्टोंबर रोजी राज्यभरात समाज परिवर्तन मार्च काढणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

अनुसुचित जातीतील उपवर्गीकरणाविरुध्द रिपब्लिकन पक्ष राज्यभरात आंदोलन करणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
कोल्हापुरातील रिपाइंच्या राज्य कमेटीच्या बैठकीत ठराव मंजुर
कोल्हापुर/मुंबई दि. 03 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड चवदारतळे सत्याग्रहाला महाड क्रांतीला यंदा 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाड चवदारतळे क्रांतीचे शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती चे द्विशताब्दी वर्ष याचे औचित्य साधुन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 14 ऑक्टोंबर पासुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात समाज परिवर्तन मार्च चे आयोजन करीत असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली. आज कोल्हापुरात आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ना. रामदास आठवले बोलत होते.
येत्या दिनांक 14 ऑक्टेंबर 2026 रोजी सकाळी सातारा येथुन समाज परिवर्तन मार्चचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापुर येथे 14 ऑक्टोंबर 2026 रोजी संध्याकाळी कोल्हापुर येथे भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर समाज परिवर्तन मार्च हा सातारा, कोल्हापुर, सांगली, सोलापुर मार्गे संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, करुन 18 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यामध्ये या समाज परिवर्तन मार्चचा समारोप करण्यात येणार आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केली.
रिपब्लिकन पक्ष सत्तेत जरी असला तरी सामाजिक प्रश्नांवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे. आंदोलन केले पाहिजे. समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. अनुसुचीत जातीमधील उपवर्गीकरण जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत करु नये. जातनिहाय जनगणना होण्याआधी उपवर्गीकरण करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा उपवर्गीरणाला पहिल्या पासुन स्पष्ट विरोध आहे. येत्या 27 जुलै रोजी रिपब्लिकन पक्षा तर्फे राज्यभरात सर्व जिल्हा, तालुका स्तरावर उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन करुन उपवर्गीकरणाचा विरोध करावा. असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी बैठकीत मंजुर झाल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे
यांनी दिली.
यावेळी अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे स्वागत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे; सौ. सीमाताई आठवले; अविनाश महातेकर बाबुराव कदम; गौतम सोनवणे; पप्पू कागदे; सिद्धार्थ कासारे; काकासाहेब खांबलकर; सुरेश बारशिंग; कांतिकुमार जैन; अशोक गायकवाड; प्रा.शहाजी कांबळे; सूर्यकांत वाघमारे; अण्णा वायदंडे सोहेल शेख; उषाताई रामलू; शिलाताई गांगुर्डे ; आशाताई लांडगे; अभयाताई सोनवणे; संगीता आठवले; रमेश मकासरे; श्रीकांत भालेराव; दयाळ बहादुर; डॉ विजय मोरे; प्रकाश जाधव;विनोद जाधव; शैलेश चव्हाण; शशिकांत वाघ; महेंद्र निळे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.




