बँकिंगमहाराष्ट्रयोजनासोलापूर

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ७ हजार ६९४ कर्जदारांचा तपशील अपलोड – जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर, दि.३० : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देशाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे, याअनुषंगाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील ७ हजार ६९४ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आहे, अशी माहिती सहकारी संस्था सोलापूर चे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली आहे.500सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बॅकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे. 5000त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
उत्तर सोलापूर१५६, दक्षिण सोलापूर ३०६, पंढरपूर ८५७, सांगोला ४७२, माळशिरस १००९, बार्शी ३४४, करमाळा १००३, मोहोळ ७२६, करमाळा १००२, अक्कलकोट २४०, मंगळवेढा १५७९.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button