सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; वैराग, बार्शीसह विविध पोलीस ठाण्यांना नवे अधिकारी

0

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तात्काळ रुजू होण्याचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर, दि. ३० : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व शाखांमध्ये कार्यरत १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी (भा.पो.से.) यांनी जारी केले आहेत. या बदल्यांमुळे वैराग, बार्शी, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, अक्कलकोट आणि सोलापूर तालुक्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचे बदल झाले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२(न)(२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक २९ जून २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले अधिकारी, पदोन्नतीनंतर हजर झालेले अधिकारी तसेच स्वेच्छेने बदलीची विनंती केलेल्या अधिकाऱ्यांच्या अर्जांचा सविस्तर विचार करण्यात आला. त्यानंतर प्रशासकीय गरज व अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार स्वखर्चाने बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.5000

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ पवार – नियंत्रण कक्ष येथून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे – वैराग पोलीस ठाणे येथून सोलापूर तालुका पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक दिपक ज्योतिराम पाटील – नियंत्रण कक्ष येथून मोहोळ पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक बाळू रसिक भरणे – जिल्हा वाहतूक शाखेतून टेंभुर्णी पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक अमूल शंकर कादबने – नियंत्रण कक्ष येथून वैराग पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक दशरथ भानुदास वाघमोडे – पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथून माळशिरस पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक तयुब युनुस मुजावर – पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथून पंढरपूर शहर पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक सुरेश गणपतराव चिल्लावार – अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक विकास चन्नवीर दिडुरे – माळशिरस पोलीस ठाणे येथून सायबर पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक दिपक लक्ष्मण बरडे – नियंत्रण कक्ष येथून जिल्हा वाहतूक शाखा.

पोलीस निरीक्षक कमलाकर नरसिंह गहिमे – नियंत्रण कक्ष येथून आर्थिक गुन्हे शाखा.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय आप्पासो सोनवणे – पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथून बार्शी तालुका पोलीस ठाणे (प्रभारी).

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आण्णासाहेब कड – आर्थिक गुन्हे शाखेतून सोलापूर तालुका पोलीस ठाणे.5000पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता आपल्या नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे तसेच रुजू झाल्याचा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या बदल्यांमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रशासकीय पुनर्रचना झाली असून, मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, कायदा व सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट करणे तसेच पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने या बदल्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः वैराग आणि बार्शी तालुक्यातील बदल्यांकडे स्थानिक स्तरावर लक्ष लागले असून, नव्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या