निधीनिवेदनबार्शीमहाराष्ट्र

श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १०० टक्के शासन निधीची मागणी; मुख्यमंत्र्यांकडे आमदार राजेंद्र राऊत यांची आग्रही भूमिका

“श्री भगवंत मंदिर विकासासाठी १००% शासन निधीची मागणी; मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक संकेत!”

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

२८६.०१ कोटींच्या विकास आराखड्याला गती देण्यासाठी विशेष बाब म्हणून संपूर्ण निधी देण्याची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक आश्वासन

बार्शी : विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर बार्शी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्री भगवंत देवस्थानच्या विकासासाठी १०० टक्के शासन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

बार्शी शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवंत देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असून, मंदिर परिसराच्या विकासासाठी तब्बल २८६.०१ कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित आहे. मात्र या आराखड्यास अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही.5000सध्याच्या शासन निर्णयानुसार ‘ब’ श्रेणीतील तीर्थक्षेत्र विकासासाठी ५० टक्के निधी शासनाकडून, २५ टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आणि उर्वरित २५ टक्के निधी देवस्थान ट्रस्टकडून उभारणे आवश्यक आहे. परंतु बार्शी नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती आणि देवस्थान ट्रस्टच्या मर्यादित उत्पन्नामुळे हा निधी उभारणे अत्यंत कठीण असल्याचे आमदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.50000यामुळे विकास आराखडा रखडण्याची शक्यता असल्याने, बार्शीचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तसेच भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून संपूर्ण १०० टक्के निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. बार्शीच्या विकासाशी संबंधित कोणताही प्रश्न प्रलंबित राहू देणार नाही आणि जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button