अकोलापुरस्कारमहाराष्ट्र

जागतिक पर्यावरण दिन शिखर परिषदेत “ऑक्सिजन मॅन” ए. एस. नाथन यांना पर्यावरण उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

अकोला : राजस्थान पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धन केंद्रातर्फे जयपुरातील हॉटेल क्लार्क्स आमेर येथे आठवी जागतिक पर्यावरण दिन शिखर परिषद 2026 झाली. त्यात पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे पर्यावरणप्रेमी ए. एस. नाथन यांना “पर्यावरण उत्कृष्टता पुरस्कार – 2026” प्रदान करून गौरविण्यात आले.5000नाथन यांचे अभिनव “स्वस्तिक वृक्षारोपण प्रतिमान” तसेच त्यांनी ’वृक्षक्रांती चळवळी’च्या माध्यमातून देशभर हरित क्रांतीला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजस्थानच्या सहकार विभागाचे सचिव डॉ. समित शर्मा, माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी, पद्मश्री पर्यावरणप्रेमी लक्ष्मणसिंह लापोडिया, दामोदर शर्मा, केरळचे माजी पर्यावरण संचालक श्रीकांतन नायर, राजनेश जैन तसेच प्रो. एम. के. पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.5000या शिखर परिषदेचे आयोजन राजस्थान पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धन केंद्राचे अध्यक्ष वैभव भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम समन्वयक विपुल इंगले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परिषदेत देशभरातील पर्यावरणतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परिषदेदरम्यान वक्त्यांनी जलसंधारण, जैवविविधता संरक्षण, हवामान बदल, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचार मांडले आणि पर्यावरण संरक्षणाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे आवाहन केले.5009

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button