महाराष्ट्रयवतमाळयोजना

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी मानधन सन्मान योजना ! दर महिना 5 हजार रुपये ; मानधनासाठी आपले सरकार पोर्टलवर अर्ज करावा

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.) यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

यवतमाळ : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” अंतर्गत दर महिना 5 हजार रुपये मानधनासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.) यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेसाठी 1 ते 31 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार http://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.500

पात्रता निकष

या योजनेसाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय 40 वर्षे आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असणे आवश्यक आहे. तसेच साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि मोलाची भर घातलेली असावी. वयाने ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. उपजीविका पूर्णपणे कलेवर अवलंबून असलेले किंवा पूर्वी कलेवर अवलंबून असलेले पण सध्या इतर कोणतेही उत्पन्न नसलेले कलाकार पात्र राहतील. केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे कलाकार या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.5000

आवश्यक कागदपत्रे

अर्जदारांनी अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा संयुक्त फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास),, राज्य किंवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास),, नामांकित संस्था अथवा व्यक्तींचे शिफारसपत्र (लागू असल्यास), तसेच विविध कार्याची पुरावे जोडणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पात्र साहित्यिक व कलाकारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या सदस्य सचिव यांनी केले आहे.590

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button