महाराष्ट्रसोलापूर

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; राजाभाऊ राऊत यांची प्रशांत परिचारक यांना सदिच्छा भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

पंढरपूर : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी पंढरपूर येथे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान प्रशांत परिचारक यांनी राजाभाऊ राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेश मालक परिचारक यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.5000बैठकीत आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्न, विविध विकासकामे तसेच सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे यावेळी उपस्थितांकडून सांगण्यात आले. आगामी काळात विकासाभिमुख आणि जनहिताच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.50009

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button