बार्शीमहाराष्ट्र
बार्शी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याची म्हैस ठार; पिंपळगाव धस येथील घटना

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात, पिंपळगाव धस येथे वीज पडून एका शेतकऱ्याची म्हैस जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव धस येथील रहिवासी आणि शेतकरी संदीप परमेश्वर पाटील यांची दुभती म्हैस काल रात्री नेहमीप्रमाणे घराबाहेर बांधलेली होती. रात्रीच्या वेळी अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. याच दरम्यान म्हशीच्या अंगावर वीज कोसळली या भीषण आघातामुळे संदीप पाटील यांची म्हैस जागीच मयत झाली.




