बार्शीसामाजिक

गुळपोळी येथे स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ९३ लोकांनी रक्तदान केले

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील स्वामी समर्थ गणेश उत्सव मित्र मंडळाने रविवारी (ता. ०४) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी सरपंच रामहरी काळे , कल्याण चिकणे , विठ्ठल मचाले , दिपक चिकणे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी समर्थ मित्र मंडळाने गेली १४ वर्षांपासून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. या वर्षी शिबिरास चांगला प्रतिसात मिळाला असून , रक्तदान शिबिरात ९३ जणांनी रक्तदान केले.बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव , पोलीस हवालदार रियाज शेख, समीर पठाण यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव यांनी मंडळाचे कौतुक केले. रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ आहे. विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य, कृष्णा चिकणे, उपसरपंच बाळासाहेब चिकणे
माजी सदस्य, शिरीष चिकणे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे, धनाजी बावणे , पोस्टमन लक्ष्मण काळे, उद्योजक श्रीकृष्ण मचाले, दिपक चिकणे, बापू राऊत, कल्याण तू चिकणे, अण्णासाहेब चिकणे, विठ्ठल मचाले, गणेश म्हेत्रे, धनाजी मचाले, धनाजी चिकणे, बापू म्हेत्रे, नागेश बारवकर, अनिल मचाले, राजू शेख, भागवत चिकणे, प्रविण चिकणे, योगेश चिकणे, अमर चिकणे, बालाजी बारवकर, गणेश बारवकर, काका लंगोटे, राहुल मचाले, दत्तात्रय काळे , दिलीप मचाले , अशोक दुसंगे, यांच्यासह गावातील महिला, व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिरास इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी संचलित श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शीचे सुधीर सुमंत, किरण जाधव, अर्जुन दळवी, अनुराधा डोंगरे, सुप्रिया लगदिवे, यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button