निवेदनबार्शीमहाराष्ट्र

दलित वस्तीनिधीमध्ये गैरवापर , बार्शी गटविकास अधिकारी यांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील २०१७-१८ पासून २०२३-२४ या कालखंडातील निधी गैरवापर झाला आहे. अशी तक्रार समाधान अनिल चौधरी यांनी बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशानुसार दलितवस्ती मध्ये ग्राम पंचायतच्या एकूण उत्पन्नापैकी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी १५ टक्के निधी हा राखीव असतो. सन २०१७-१८ पासून २०२३-२४ या कालखंडातील निधीचा गैरवापर झालेला आहे. या निधीचा कुठल्याही प्रकारे वापर केलेला नाही.

तरी ग्रामसेवक वैभव माळकर आणि तळेकर यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, व मला योग्य तो न्याय मिळावा अन्यथा पंचायत समितीसमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल , असा इशारा समाधान अनिल चौधरी यांनी दिला आहे. पुढे या तक्रार मध्ये काय होते. याकडे गुळपोळी ग्रामस्थांचे लक्ष्य लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button