जयंतीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत २००० ड्रोनच्या भव्य शोद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य आणि अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रथमच २००० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात प्रकाशचित्र साकारत महामानवाच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडला जाणार आहे.5009या कार्यक्रमात ‘भीम स्वरांचा उत्सव’ देखील साजरा करण्यात येणार असून, विविध सांस्कृतिक सादरीकरणातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साकारण्यात येणारा हा ड्रोन शो मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.5000हा विशेष कार्यक्रम रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे. महामानवाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button