बार्शीकरांसाठी खुशखबर! अल्कलाईन वॉटर आयोनायझरचे बार्शीत लाईव्ह डेमो

“बार्शीत अल्कलाईन वॉटर आयोनायझरचा लाईव्ह डेमो; आरोग्यदायी पाण्याबाबत जनजागृती”
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. १३ जून : बार्शीकरांसाठी आरोग्यदायी पिण्याच्या पाण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी “आयनक्लस्टर अल्कलाईन वॉटर आयोनायझर”चा लाईव्ह डेमो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अल्कलाईन पाण्याचे फायदे, त्यामागील तंत्रज्ञान आणि आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, आयनक्लस्टर अल्कलाईन वॉटर आयोनायझर हे इलेक्ट्रोलिसिस तंत्रज्ञानाद्वारे पाण्याचे आयोनायझेशन करून अल्कलाईन वॉटर तयार करते. या पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचा ORP (Oxidation Reduction Potential) निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, अल्कलाईन आयोनाईज्ड वॉटरमध्ये खनिजांचे प्रमाण अधिक असून मायक्रो-क्लस्टर्ड मॉलेक्युल्समुळे शरीराला पाणी शोषून घेण्यास मदत होते. तसेच बाटलीबंद किंवा सामान्य आरओ पाण्याच्या तुलनेत त्याचे वेगळेपणही डेमोमध्ये दाखविण्यात येणार आहे.
हा लाईव्ह डेमो रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला असून, राधे पॅलेस, भरडिया पेट्रोल पंपाजवळ, शिवाजी आखाडा, बार्शी येथे कार्यक्रम होणार आहे.
आयोजकांनी बार्शीकरांना कुटुंबासह उपस्थित राहून अल्कलाईन वॉटर आयोनायझरची माहिती जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमात उत्पादनाचे प्रात्यक्षिक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.




