बार्शीमहाराष्ट्रयोजना

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील अनुदान मिळवण्यासाठी आता आधार कार्ड वरील वय धरणार ग्राह्य

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या गरजू नागरिकांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनांच्या लाभासाठी वयाचा पुरावा म्हणून आवश्यक असलेली शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्मदाखल्याची अट शिथिल करण्यात आली असून, आता वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांअभावी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आमदार राजाभाऊ राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांच्या सर्व प्रकरणांमध्ये वयाचा पुरावा म्हणून केवळ शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला सादर करण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.500ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती आणि गरजू लाभार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्मदाखला उपलब्ध नसतो. त्यामुळे पात्रता असूनही त्यांना योजनांचा लाभ मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आ. राजाभाऊ राऊत यांनी शासनाकडे हा प्रश्न मांडला होता.

या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्णय घेतल्याची माहिती बार्शी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ॲड. रणवीर भैय्या राऊत यांनी दिली.
या निर्णयामुळे वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार असल्याने लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, निराधार आणि गरजू नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील पात्र व गरजू लाभार्थ्यांनी या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. रणवीर भैय्या राऊत यांनी केले आहे.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button