निवेदनबार्शीमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २० मागण्यांचे निवेदन; बार्शी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे!

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुपालक आणि ग्रामीण भागातील वंचित घटकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि महाराष्ट्र दुष्काळ निवारण व निर्मूलन समितीच्या वतीने शासनाकडे २० महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील निवेदन आकाश दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बार्शी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना सादर केले. या निवेदनात दुष्काळग्रस्त कुटुंबांना प्रतिकुटुंब किमान १५ हजार रुपयांची आर्थिक मदत, नियमित पाणीपुरवठा, रोजगार हमीची कामे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, जनावरांसाठी मोफत चारा व पाणी, रेशन वितरणातील अडचणी दूर करणे, वीजपुरवठ्याबाबत संरक्षण आणि कर्जवसुलीला ६ ते ८ महिन्यांची स्थगिती देणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.500तसेच आरोग्य सुविधा, महिला बचतगटांच्या कर्जाला सवलती, बालमजुरी रोखणे आणि प्रत्येक दुष्काळग्रस्त गावाचा स्वतंत्र निवारण आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २४ दिवसांच्या आत उच्चस्तरीय बैठक घेऊन समितीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी आकाश दळवी, दयानंद पिंगळे, बाळाजी डोईफोडे, उमेश नेवाळे, दत्तात्रय पाटील, सागर केसरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button