डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ‘राजा माने’ तिसऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनासाठी गोव्याकडे रवाना…
B1न्यूज मराठी नेटवर्क
माढा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन दिनांक 4 मे रोजी, कला अकादमी, पणजी, गोवा या ठिकाणी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाही थाटामध्ये संपन्न होणार आहे. या अधिवेशनासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आजोळी मोडनिंब येथील ग्रामदैवत श्री. वेताळ बाबांचे दर्शन घेऊन गोव्याकडे टीमसह रवाना झाले आहेत. याप्रसंगी मोडनिंबकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी वेताळ देवस्थान ट्रस्टचे संभाजी लादे, सचिव विजय खेलबुडे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे ॲड. विजयसिंह गिड्डे, पत्रकार प्रथमेश पवार, यशवंत पवार, जयंत पवार, पुजारी गुरव, अमेय पवार, श्रेयस फाळके आदी उपस्थित होते.







