बार्शीत बुद्ध जयंतीनिमित्त भव्य ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन
प्रबुद्ध भारत ट्रस्टतर्फे बार्शीत भव्य व्याख्यानाचे आयोजन , ३० राज्यांतील बौद्ध वारशाचे बार्शीत सचित्र सादरीकरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, बार्शी यांच्या वतीने वैशाख पौर्णिमा निमित्त बुद्ध जयंती तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त ३० राज्यांतील प्राचीन बुद्ध लेण्या, स्तूप, चैत्य व विहार या ऐतिहासिक वारशाचे सचित्र व्याख्यानाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पूज्य भन्ते सुमेधजी नागसेन (श्रावस्ती बुद्धविहार, खरोसा/बार्शी) भूषवणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून मा. डॉ. मुकुंद गायकवाड (सेवानिवृत्त प्राचार्य, धाराशिव) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून मा. सागर कांबळे (नवी मुंबई) मार्गदर्शन करणार असून “प्राचीन जम्बुद्वीपाचा समृद्ध बौद्धमय वारसा” या विषयावर ते सविस्तर माहिती देणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सायं. ६:०० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे संयोजन श्रावस्ती बुद्ध विहार, बार्शी, मातोश्री रमाई महिला मंडळ, बार्शी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समविचारी फ्रंट, बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







