बार्शीत मंडळ अधिकाऱ्याला ३००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तहसील कार्यालयातील उपळे (दुमाला) मंडळाचे मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३) यांना ३,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ पकडले.5000तक्रारदाराच्या आजीचे वडील मयत झाल्याने त्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस म्हणून आजीचे नाव नोंदवण्यासाठी अर्ज केला होता. तलाठ्यांनी घेतलेल्या नोंदीस प्रमाणित करण्यासाठी व ७/१२ उताऱ्याचे लॉक काढण्यासाठी मंडळ अधिकारी फुलारी यांनी पंचासमक्ष ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. एसीबी सोलापूरच्या पथकाने २८/०४/२०२६ रोजी पडताळणी करून त्याच दिवशी सापळा रचला. सापळा कारवाई दरम्यान आरोपी फुलारी यांनी तक्रारदाराकडून ३,००० रुपये लाच स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.5000आरोपी हेमंत फुलारी हे प्लॅट नं. ४०७, मन्मीत ब्लॉसम, जुनी आयएमएस शाळेजवळ, जुळे सोलापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी पोहवा स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला व चापोकों अक्षय श्रीराम यांच्या पथकासह केली.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या