क्यूआर कोडद्वारे घरबसल्या ई-केवायसी करा; गॅस एजन्सीसमोरील गर्दी टाळा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच ई-केवायसी प्रक्रियेसाठी गॅस एजन्सीसमोर रांगा लावू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे. नागरिकांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून घरी बसून मोबाईलद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या तीन प्रमुख कंपन्यांच्या एकूण २० गॅस एजन्सी कार्यरत आहेत. सध्या ई-केवायसी आणि गॅस बुकिंग संदर्भात माहिती घेण्यासाठी नागरिकांची एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.5000जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, जिल्ह्यात एलपीजीसह पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. मागणीनुसार पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी अनावश्यक घाईगडबड करून बुकिंग करू नये. गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमानुसार केला जात असून शहरी भागात एक गॅस कनेक्शन धारकास २५ दिवसांत, डबल कनेक्शन धारकास ३५ दिवसांत आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या कालावधीत सिलेंडर घरपोच दिला जात आहे.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात पुरवठा विभागाचे तीन कर्मचारी तसेच बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या कंपन्यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. गॅस सिलेंडर संदर्भातील तक्रारी तत्काळ सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.5000ई-केवायसी प्रक्रियेसाठी संबंधित कंपनीचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करून माहिती भरावी आणि ‘आधार फेस आरडी’ अ‍ॅपच्या माध्यमातून प्रमाणीकरण करून प्रक्रिया पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे. इंडेन ग्राहकांनी Indane Oil ONE, बीपीसीएल ग्राहकांनी BPCL For Business आणि एचपीसीएल ग्राहकांनी HP PAY हे अ‍ॅप वापरावे.

गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडर ठरलेल्या कालावधीत घरपोच मिळणार असल्यामुळे नागरिकांनी एजन्सीसमोर गर्दी करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही अडचण असल्यास अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या 0217-2731008 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या